Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक

शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक

Beed Crime News: बीड जिल्ह्याच्या सीमेजवळील मांदगाव परिसरात बुधवारी उशिरा शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. रात्री प्रवास करत असताना दहा ते पंधरा जणांच्या मुखवटाधारी गटाने त्यांच्या वाहनाला अडवून अचानक हल्ला चढवला. सुरुवातीला गाडीवर दगडफेक करत वाहनाची तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी खाडे यांच्यावर वार करण्यात आले. स्वतःचा बचाव करताना त्यांनी हातावर काही वार झेलले. यात खाडे गंभीर दुखापत झाले आहेत.

घटनेनंतर त्यांना तातडीने अहिल्यानगरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांची शुद्ध हरपली होती आणि हातावर खोल जखमा होत्या. प्राथमिक उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले. पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी हल्लेखोरांची ओळख स्पष्ट झालेली नाही.

हेही वाचा –राजगुरुनगरमध्ये साडेचार वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्या हल्ला; आईच्या आवाजामुळे बिबट्या भेदरला अन् मुलगा वाचला

नेमके घडले काय?

नगर–सोलापूर महामार्गावरील मांदळी गावाजवळ ही घटना घडली. हॉटेलमध्ये जेवण करून खाडे व त्यांचे सहकारी नगरकडे परतत असताना अज्ञात टोळक्याने चेहऱ्यावर रुमाल बांधून लाठ्या, सत्तूर, तलवारी आणि पिस्तुलासारख्या शस्त्रास्त्रांसह त्यांच्यावर हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यात खाडे यांच्यासोबत त्यांच्या तिघा सहकाऱ्यांनाही गंभीर मार बसला.

हल्ल्यानंतर घटनास्थळी मिळालेल्या व्हिडिओमध्ये एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याचे स्पष्ट दिसत असल्याची माहिती आहे. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला आहे. खाडे यांनी भ्रष्टाचाराविरोधात दिलेल्या तक्रारींमुळेच त्यांना लक्ष्य केले गेले, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे वास्तविक हल्लेखोरांसह या कटामागील सूत्रधारांनाही अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!