Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘अधिकारी जितका भ्रष्ट, तितका राजकारण्यांचा लाडका’; विजय कुंभार यांची कडक शब्दांत टीका

‘अधिकारी जितका भ्रष्ट, तितका राजकारण्यांचा लाडका’; विजय कुंभार यांची कडक शब्दांत टीका

Pune Land Scam: बोपोडी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या आदेश रद्द करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जाच्या पुनर्विलोकनास परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून प्रकरणातील जमिनीची माहिती गोळा केली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी येवले यांच्या कथित भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका. अशा व्यक्तीस नागपूरहून पुण्यात का आणलं गेले? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का दिले गेले? यामागे कोणाचं राजकीय छत्र आहे? यावेळी कुंभार यांनी नागरी सेवा मंडळच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केला.

येवलेंची कारकीर्द व आरोप

  • २००१ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिल्यानंतर अपंग (कर्णबधिर) कोट्यातून पास झालेले येवले २००४ मध्ये नायब तहसीलदार पदावर रुजू झाले.
  • २०११ मध्ये उमरेड (नागपूर) येथे १०,००० लाच घेतल्याचा आरोप.
  • २०१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणात २–२.५ लाख लाच घेण्याचे आरोप.
  • २०१६ मध्ये पुणे विभागात बदली; इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू झाल्यावर ५८ सरकारी जमिनींचे अनियमित वाटप, वाळूमाफियाकडून संगनमत.
  • १४ वर्षांत ७ वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, परंतु प्रत्येक वेळी “सेटिंग” लावून बचाव.
  • मोबोज हॉटेल आणि “मुंढवा जमीन घोटाळा” प्रकरणात सक्रिय सहभाग.

कुंभार यांनी या प्रकरणातून असा सवाल उपस्थित केला आहे की, ज्याची कारकीर्दच घोटाळ्यांच्या आरोपांनी भरलेली आहे, त्याच्याकडून सार्वजनिक पदावर योग्य वर्तन अपेक्षित कसे ठरवता येईल? सध्या जिल्हा प्रशासनाने सूर्यकांत येवले यांच्या आदेशांची रद्दबातल प्रक्रिया सुरू केली असून, प्रकरणातील पुढील तपास आणि कारवाई लक्षात घेतली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!