Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लग्नापूर्वीचं जोडप्याने स्टेशनवर केलं ‘असं’ काम की, पुणे मेट्रोने ठोठावला दंड

लग्नापूर्वीचं जोडप्याने स्टेशनवर केलं ‘असं’ काम की, पुणे मेट्रोने ठोठावला दंड

Pune Metro: लग्नापूर्वीच्या आठवणी टिपण्यासाठी मेट्रो परिसर निवडणं एका जोडप्याला चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यातील या जोडप्याने अधिकृत परवानगी न घेता पुणे मेट्रोच्या परिसरात आणि ट्रेनमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट केल्यामुळे मेट्रो प्रशासनाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. मेट्रो अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मेट्रो कर्मचाऱ्यांनी वारंवार इशारे देऊनही जोडप्याने आणि छायाचित्रकाराने शूटिंग सुरूच ठेवले. त्यामुळे मेट्रोच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित सर्वांवर कारवाई करण्यात आली.

पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारचे फोटोशूट, व्हिडिओ शूट किंवा प्रमोशनल गोष्टींना पूर्वपरवानगी आवश्यक आहे. अशा अनधिकृत कृतींमुळे मेट्रोच्या नियमित कामकाजात व्यत्यय येऊ शकतो आणि प्रवाशांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा – Pune Metro: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे मेट्रो चांदणी चौक महामार्गावर 508 मीटर लांबीचा फूट-ओव्हर-ब्रिज उभारणार

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मेट्रो परिसरात शिस्त आणि सुरक्षिततेचा भंग करणाऱ्या कृती टाळाव्यात. मेट्रो क्षेत्र हे सार्वजनिक ठिकाण असल्याने त्यात नियमांचे पालन करणे प्रत्येक प्रवाशाचे कर्तव्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!