Dharmendra Health Update: ज्येष्ठ अभिनेते आणि बॉलिवूडचे धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या ८९ वर्षीय अभिनेत्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांच्या बंगल्यावरच पुढील उपचार केले जाणार आहेत. धर्मेंद्र यांना १० नोव्हेंबर रोजी प्रकृती बिघडल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची तब्येत हळूहळू सुधारत गेली. त्यामुळे कुटुंबाने त्यांना घरी नेण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णवाहिकेद्वारे घरी नेण्यात आले. इन्स्टंट बॉलिवूडने त्यांच्या घरी नेण्यात येत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, चाहत्यांनी या बातमीवर आनंद व्यक्त करत त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी तसेच मुलगी ईशा देओल यांनीही त्यांच्या आरोग्याविषयी माहिती दिली आहे. ईशा देओलने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “वडिलांची तब्येत आता स्थिर असून ते वेगाने बरे होत आहेत. मीडियामध्ये पसरत असलेल्या अफवांकडे दुर्लक्ष करा आणि आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा.”
हेही वाचा – Dharmendra Health Update: ‘धर्मेंद्र बरे होत आहेत…’; हेमा मालिनी यांचा मोठा खुलासा!
View this post on Instagram
धर्मेंद्र मागील १२ दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवांनी मंगळवारी सोशल मीडियावर जोर धरला होता, मात्र कुटुंबियांनी लगेचच स्पष्ट केले की धर्मेंद्र जिवंत असून त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. बॉलिवूडमधील शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांसारख्या अनेक कलाकारांनी रुग्णालयात जाऊन धर्मेंद्र यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. सध्या ‘ही-मॅन’ सुरक्षित असून, त्यांच्या चाहत्यांसाठी ही निश्चितच दिलासा देणारी बातमी आहे.


