Today मंगळवार, 11th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नाव रवींद्र, पण फोटो महिलेचा…! मतदार यादीतील अजब कारभारामुळे पुणेरी काकांना मतदान केंद्रावर द्यावी लागली सत्वपरीक्षा

नाव रवींद्र, पण फोटो महिलेचा…! मतदार यादीतील अजब कारभारामुळे पुणेरी काकांना मतदान केंद्रावर द्यावी लागली सत्वपरीक्षा

Pune Municipal Corporation Election : लोकशाहीचा उत्सव साजरा करायला आलो की स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करायला? असा संतप्त सवाल विचारण्याची वेळ पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकावर आली. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान, मतदार यादीतील एका विचित्र चुकीमुळे रवींद्र नावाच्या मतदाराला चक्क आपण ‘पुरुष’ असल्याचे सिद्ध करण्यासाठी आधार कार्डचा आधार घ्यावा लागला. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर वणव्यासारखा पसरला असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

नेहमीप्रमाणे उत्साहात मतदानासाठी गेलेल्या रवींद्र नावाच्या या काकांचा गोंधळ तेव्हा उडाला, जेव्हा मतदान केंद्रावरील यादीत त्यांच्या नावासमोर एका अज्ञात महिलेचा फोटो झळकला. नावात ‘रवींद्र’ हे नाव स्पष्टपणे दिसत असूनही, केवळ फोटो महिलेचा असल्याने निवडणूक ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना मतदानापासून रोखले. या चुकीबद्दल विचारणा केली असता, “यादीत जे आहे तेच आम्ही मानणार,” असे उत्तर देत अधिकाऱ्यांनी सुरुवातीला मदत करण्यास नकार दिला आणि आपली जबाबदारी झटकली.

पुराव्याची लढाई आणि मतदानाचा हक्क

आपला मतदानाचा हक्क सोडायचा नाही, या जिद्दीने काकांनी तातडीने पुन्हा घर गाठले. त्यांनी आपले मूळ आधार कार्ड आणून दिले आणि आपणच ‘तो’ रवींद्र आहोत हे पुराव्यासह सिद्ध केले. या कसरतीनंतरच त्यांना मतदान कक्षात प्रवेश मिळून मतदानाचा हक्क बजावता आला. मात्र, एका ज्येष्ठ नागरिकाला ऐन मतदानाच्या वेळी उन्हात घराच्या फेऱ्या माराव्या लागल्या, याबद्दल उपस्थित नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रशासकीय दाव्यांची पोलखोल

निवडणूक आयोग नेहमीच मतदार यादी शुद्धीकरण आणि अचूकतेचे मोठे दावे करत असतो, मात्र प्रत्यक्ष मैदानात आलेल्या या अनुभवामुळे या दाव्यांमधील फोलपणा उघड झाला आहे. ‘X’ (ट्विटर) वर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर मिश्किल टिप्पणी करत टीकेचा वर्षाव केला आहे. “रवींद्र नावाच्या माणसाला जर स्वतःची ओळख पटवण्यासाठी एवढी कसरत करावी लागत असेल, तर यादी बनवणारे कर्मचारी नेमके काय करत होते?” असा रोखठोक प्रश्न आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!