Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune PMC Election : पुण्यातील ‘या’ भागांतील निकाल लागणार सर्वात आधी; प्रशासनाची तयारी पूर्ण

Pune PMC Election : पुण्यातील ‘या’ भागांतील निकाल लागणार सर्वात आधी; प्रशासनाची तयारी पूर्ण

Pune PMC Election : पुणे महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला १६ जानेवारीला होणार असून प्रशासकीय यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रभागांची रचना आणि फेऱ्यांचे गणित पाहता, काही प्रभागांचे निकाल दुपारपूर्वीच स्पष्ट होणार आहेत. निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीच्या नियोजनाचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे.

सकाळी ११:३० ला गुलाल उधळणार?

१५ जानेवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १६ जानेवारीला मतमोजणीला प्रारंभ होईल. एकूण ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ही लढत होत आहे. एका फेरीसाठी साधारण ३० मिनिटांचा अवधी लागणार असून, सकाळी ११:३० वाजेपर्यंत पुण्याचा पहिला अधिकृत निकाल जाहीर होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

हेही वाचा – Amaravati Politics : मतदानाच्या तोंडावर भाजप ‘ॲक्शन मोड’वर; १५ पदाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन, नेमकं कारण काय?

निकाल लवकर कुठे आणि उशिरा कुठे?

सर्वात वेगवान निकाल: बिबवेवाडी, कसबा-विश्रामबाग आणि कोंढवा-येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या १३ प्रभागांचे निकाल सर्वात आधी जाहीर होतील. येथे केवळ १२ फेऱ्या होणार असल्याने चित्र लवकर स्पष्ट होईल.

निकालाला विलंब कुठे?
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक २० फेऱ्या होणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ३८ (बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज) येथे ५ सदस्यांचा प्रभाग असल्याने मतमोजणीसाठी अधिक वेळ खर्ची पडेल. दरम्यान, पुणे महापालिका निवडणूक उपायुक्त, प्रसाद काटकर यांनी सांगितलं की, मतमोजणीची प्रत्येक फेरी सरासरी ३० मिनिटांची असेल. दुपारी ४ वाजेपर्यंत संपूर्ण शहराचे राजकीय चित्र स्पष्ट होईल, अशा पद्धतीने आम्ही सूक्ष्म नियोजन केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!