Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune New Mayor: पुण्याचा नवा ‘कारभारी’ कोण? भाजपच्या विजयी हॅट्रिकनंतर महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू; ‘या’ नावांची चर्चा

Pune New Mayor: पुण्याचा नवा ‘कारभारी’ कोण? भाजपच्या विजयी हॅट्रिकनंतर महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू; ‘या’ नावांची चर्चा

Pune New Mayor: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन-तृतीयांश बहुमत मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आता पुणेकरांच्या नजरा “पुण्याचा पुढचा महापौर कोण?” या प्रश्नाकडे लागल्या आहेत. सलग दोनदा हे पद ‘खुला प्रवर्ग’ (Open) राहिल्यामुळे यंदा भाजपमधील दिग्गजांनी या खुर्चीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षात अनुभवी नगरसेवकांची मोठी फौज असल्याने अंतिम नाव निश्चित करताना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे.

महापौरपदाच्या शर्यतीत ‘हे’ आहेत चर्चेतील चेहरे

भाजपकडून महापौरपदासाठी अनेक अनुभवी आणि नवीन नावांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामध्ये माजी शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बीडकर आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले ही नावे आघाडीवर आहेत. जर हे पद महिलांसाठी राखीव झाले, तर वर्षा तापकीर, मानसी देशपांडे किंवा मंजूषा नागपुरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. याशिवाय राजेंद्र शिळीमकर, प्रसन्न जगताप, अनिल टिंगरे आणि योगेश मुळीक हे देखील प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तसेच, पक्षात नव्याने आलेल्या पृथ्वीराज सुतार, बाळा ओसवाल आणि सचिन दोडके यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे.

आरक्षणाच्या ‘सोडती’कडे सर्वांचे लक्ष

विजयाचा उत्साह असला तरी, अनेक इच्छुकांच्या आशा राज्य सरकारच्या आरक्षणाच्या सोडतीवर अवलंबून आहेत. महापौरपद ‘खुला प्रवर्ग’, ‘महिला’ की ‘मागास प्रवर्ग’ यासाठी राखीव होणार, हे पुढील 2 ते 3 आठवड्यांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या आरक्षणावरच अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य ठरेल. २०१७ च्या सत्तेत भाजपने मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व दिले होते; आता या दुसऱ्या इनिंगमध्ये पक्ष आक्रमक अनुभवी नेत्याला संधी देतो की नव्या चेहऱ्याला, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!