Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Local Body Election : बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, काय आहे कारण?

Local Body Election : बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, काय आहे कारण?

बारामती : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांचा धुरळा सध्या सगळीकडे उडाला असताना, बारामती नगरपरिषदेत मात्र मोठा तिढा निर्माण झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारामतीसह पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

ण बारामतीत प्रभाग क्रमांक १३(ब) आणि १७(अ) या दोन प्रभागांतील निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावातील ही निवडणूक आणखी चर्चेत आली आहे.

स्थगितीचे मुख्य कारण काय?

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत (२६ नोव्हेंबर) संपल्यानंतर या दोन प्रभागांसाठी नव्याने दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. भाजपचे उमेदवार सतीश फाळके (प्रभाग १३(ब)) आणि अविनाश गायकवाड (प्रभाग १७(अ)) यांचे हे अर्ज तांत्रिक त्रुटींमुळे प्रथम नामंजूर करण्यात आले. यानंतर उमेदवारांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आणि ‘नैसर्गिक न्याय’ तत्त्वानुसार याचिका दाखल केल्या.

न्यायालयाने सुनावणीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांना हे अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले, ज्यात सीसीटीव्ही फुटेज आणि पुरावे सादर करण्यास सांगितले. मात्र, सुधारित आदेश आणि प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या प्रभागांतील मतदान स्थगित ठेवण्यात आले आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित आदेश मिळाल्यानंतरच या प्रभागांसाठी पुढील प्रक्रिया (मतदान व मोजणी) राबवली जाईल. यामुळे उर्वरित सर्व प्रभागांसह नगराध्यक्ष पदाची निवडणूक मात्र पूर्वीप्रमाणेच २ डिसेंबरला होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!