Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ZP-Panchayat Samiti Election : राज्यात महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध, पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

ZP-Panchayat Samiti Election : राज्यात महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध, पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Zilla Parishad And Panchayat Samiti Election Result 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शनिवारी झालेल्या मतदानात जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1,462 जागांसाठी तब्बल 7,438 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा यात समावेश आहे. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीपूर्वीच महायुतीला मोठा दिलासा मिळाला असून, कोकण विभागात तब्बल 27 जागा बिनविरोध जिंकण्यात महायुतीला यश आलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेत 8 आणि पंचायत समितीत 17 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाचा 1 सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. तर 100 सदस्यांच्या पंचायत समितीत भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे.

याशिवाय रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातूनही शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. महाड पंचायत समितीमध्ये अनिल जाधव, तर रत्नागिरीतील नाणीज पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महायुतीच्या या यशामुळे कोकणात राजकीय ताकद अधिक मजबूत झाल्याचं चित्र आहे. उर्वरित जागांवरील निकालांमधून आता कोणाची सत्ता येणार, कोण बाजी मारणार आणि कोणाला पराभव स्वीकारावा लागणार याचा फैसला आज होणार आहे.

विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग (8 बिनविरोध )

१) खारेपाटण : प्राची इस्वालकर(भाजप)
२)बांदा : प्रमोद कामत (भाजप)
३)जाणवली : रुहिता राजेश तांबे ( भाजची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना)
४)पडेल : सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
५)बापर्डे : अवनी अमोल तेली (भाजप)
६) पोंगुर्ले : अनुराधा महेश नारकर (भाजप)
७)किंजवडे : सावी गंगाराम लोके (भाजप)
८) कोळपे : प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)

पंचायत समिती कणकवली(6 बिनविरोध)

१)वरवडे : सोनू सावंत (भाजपा)
२)नांदगाव : हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)
३) जाणवली महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)
४) बिडवाडी :संजना संतोष राणे (भाजप)
५) हरकुळ बुद्रुक : दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप)
६) नाटळ : सायली संजय कृपाळ (भाजप)

देवगड तालुक्यातील पंचायत समिती(6 बिनविरोध)

१)पडेल : अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
२)नाडण : गणेश सदाशिव राणे (भाजप)
३)बापर्डे : संजना संजय लाड (भाजप)
४) फणसगाव : समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)
५) शिरगाव : शितल सुरेश तावडे (भाजप)
६) कोटकामते : ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप)

पंचायत समिती वैभववाडी(1 बिनविरोध)

१) कोकिसरे : सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)
पंचायत समिती वेंगुर्ले (1 बिनविरोध)
१)आसोली: संकेत धुरी (भाजप)

मालवण पंचायत समिती (1 बिनविरोध)

१)अडवली मालडी : सीमा सतीश परुळेकर (भाजप)
सावंतवाडी पंचायत समिती (1 बिनविरोध)
१)शेरले : महेश धुरी (भाजप)
दोडामार्ग पंचायत समिती (1 बिनविरोध)
१)कोलझर : गणेश प्रसाद गवस (शिंदे सेना)

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!