किचनमध्ये स्वयंपाक करताना कांदे कापणे हे काय नवीन नाही. हेच कांदे कापताना डोळ्यातून पाणी येते. भाजी असो किंवा सॅलड, कांदे बहुतेक पदार्थांचा एक भाग असतात. पण, कापताना डोळ्यातून पाणी येत असल्याने अनेकजण हेच कांदे कापताना कचरतात. मात्र, काही सोप्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला डोळ्यात पाणी न ढाळता कापाण्यास मदत करतील.
कांदा कापताना डोळ्यांतून पाणी येऊ लागते हे त्रासदायक असते. कांदे कापताना किंवा सोलताना, त्यातील सल्फर संयुगे हवेच्या संपर्कात आल्यावर वायू सोडतात. हा वायू डोळ्यांपर्यंत पोहोचतो आणि जळजळ आणि पाणी आणतो. कांदे कापताना पाणी टाळण्यासाठी, कापण्यापूर्वी ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. कांदे रेफ्रिजरेटरमध्ये किंवा थंड पाण्याच्या कंटेनरमध्ये १० ते १५ मिनिटे ठेवल्याने कांद्यामध्ये असलेले सल्फर डायऑक्साइड कमी होते. थंड पाणी वायू तयार होण्याची प्रक्रिया मंदावते, डोळ्यांना त्रास होत नाही.
दुसरी पद्धत म्हणजे वाहत्या पाण्याखाली कांदा सोलणे किंवा कापणे. पुढच्या वेळी तुम्ही कांदा सोलताना तो नळाखाली धरा. वाहत्या पाण्याखाली कांदा सोलताना, बाहेर पडणारा वायू पाण्यात विरघळतो आणि हवेत पसरत नाही. यामुळे डोळ्यांपर्यंत वायू पोहोचण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
धारदार चाकू वापरावा
कांदे कापताना नेहमीच धारदार आणि टोकदार चाकू वापरा. बोथट चाकू कांद्याच्या पेशी अधिक तोडतो, ज्यामुळे जास्त वायू बाहेर पडतो. दुसरीकडे, धारदार चाकू कांदा लवकर आणि स्वच्छ कापतो, ज्यामुळे कमी वायू होतो.


