Weather Alert: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) कुलाबा वेधशाळेने महाराष्ट्रासाठी नवीन हवामान अंदाज जारी केला असून २२, २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील उर्वरित भागात कोरडे हवामान कायम राहील, अशी शक्यता आहे.
मुंबई: निरभ्र आकाश
मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील काही दिवस प्रामुख्याने निरभ्र आकाश राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानुसार, कमाल तापमान ३३°C तर किमान तापमान २१°C राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.
कोकण-पश्चिम महाराष्ट्र: हलक्या पावसाची चिन्हे
IMD नुसार खालील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तथापी, पुणे आणि सोलापूर येथे हवामान कोरडेच राहील.
हेही वाचा – Pune: पुणेकरांनो लक्ष द्या! उघड्यावर शेकोटी पेटवल्यास बसणार दंड, थंडीच्या दिवसात महापालिकेचा अजब निर्णय
उत्तर महाराष्ट्र: थंडीची तीव्रता कमी
गेल्या काही दिवसांत वाढलेल्या थंडीपासून उत्तरेकडील जिल्ह्यांना थोडा दिलासा मिळू शकतो.
नाशिक: कमाल ३०°C, किमान १३°C
जळगाव: कमाल ३०°C, किमान १३°C
मराठवाडा: तापमानात सौम्य वाढ
मराठवाड्यात हळूहळू रात्रीचे तापमान वाढताना दिसू शकते. तथापी, छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान १५°C पर्यंत वाढणार आहे. याशिवाय, विदर्भांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये थंडीपासून आंशिक दिलासा मिळू शकतो. दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता असून, राज्यात मोठ्या हवामान बदलाचा कोणताही अंदाज नाही. नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात ठेवून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन IMD ने केले आहे.


