Today बुधवार, 28th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध कृष्णा-भिमा आघाडीत लढत

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध कृष्णा-भिमा आघाडीत लढत

Indapur Election : इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. नगराध्यक्ष पदासाठी ११ पैकी ५ उमेदवारांनी मागे हटत ६ जण रिंगणात राहिले आहेत. तसेच नगरसेवक पदाच्या १५० पैकी ७१ जणांनी माघार घेतल्याने ७९ उमेदवारांमध्ये चुरस राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर मागाडे आणि सहाय्यक अधिकारी रमेश ढगे यांनी दिली. इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष विरुद्ध कृष्णा- भीमा विकास आघाडीतच लढत रंगणार असल्याचे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी भरत शहा विरुद्ध कृष्णा-भीमा विकास आघाडीतून प्रदीप गारटकर यांच्या मुख्य लढत होत आहे. पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना डावलून भरत शहा यांना पक्षात घेऊन नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पदाचा राजीनामा देऊन शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपाचे नेते प्रवीण माने, रासप, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि इतर लहान मोठ्या पक्ष संघटनांना एकत्रित आणून निवडणुकीला रंगत आणली आहे.

हेही वाचा –इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड; उबाठाचा कृष्णा-भिमा विकास आघाडीला जाहीर पाठिंबा

आघाडी होण्याअगोदर अनेक जण इच्छुक होते आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमधून अनेकांना यावर पाणी सोडावे लागले तर काही जणांना इच्छा नसताना अर्ज माघारी घ्यावा लागला याचा कितपत परिणाम प्रत्यक्ष निवडणुकीच्या मतदानावर होतो हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीतच इंदापूर मध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे विरुद्ध विरोधातील सर्व बडे नेते एकत्रित आले आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

माघार घेतलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

  • महादेव वसंत सोमवंशी — शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
  • तानाजी अनिल देशमुख — अपक्ष
  • वसंत एकनाथ माळुंजकर — कृष्णा-भीमा विकास आघाडी
  • पांडुरंग हरिभाऊ शिंदे — अपक्ष
  • शिवाजी वामन मखरे — अपक्ष

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून पाच जणांची तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीतून ७१ जणांची माघार घेतली आहे. नगरसेवक पदासाठी एकूण १६९ पैकी ७१ जणांनी माघार घेतली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!