Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यभरात हुडहुडी! पुढील 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे, IMD ने जारी केला अलर्ट

राज्यभरात हुडहुडी! पुढील 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे, IMD ने जारी केला अलर्ट

Cold Wave In Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्याचा जोर आता कमी होत चालला असून, थंडी हळूहळू आपली चाहूल देऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी पर्यंत थंड हवामानाचा प्रभाव फारसा न जाणवणाऱ्या महाराष्ट्रात आता पहाटे आणि रात्रीच्या वेळी बोचऱ्या गार वाऱ्यांनी जोर पकडला आहे. तापमानात जाणवणारी घसरण कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह मुंबईतही स्पष्टपणे जाणवत आहे, त्यामुळे नागरिकांनी ऊबदार कपड्यांची तयारी पुन्हा सुरू केली आहे. देशभरातील डिसेंबरच्या हवामानात मोठा लहरीपणा दिसून येतो आहे. दक्षिण भारतात अवकाळी पावसाचा तडाखा कायम असतानाच, महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्याची थंडी पसरू लागली आहे. वातावरणातील आर्द्रता कमी होणे आणि वाऱ्याचा वेग बदलणे यामुळे रात्रीचे तापमान अधिक झपाट्याने खाली येत असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

कोकणात थंडी वाढण्याची शक्यता

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस किमान तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान ७ अंश सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. याचबरोबर पहाटे निर्माण होणारे दाट धुके वाहनधारकांसाठी अडथळा ठरू शकते, म्हणून सतर्क राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमानात जाणवणारी घट सुरू झाली असली, तरी कोकणात थंडी वाजण्यास सुरुवात झाली आहे. तथापी, विद्यमान हवेच्या प्रवाहामुळे पुढील आठवड्यात कोकणातही थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?

उत्तरेकडील राज्यात तापमानात घट – 

तर दुसरीकडे, उत्तर-पश्चिम भारतात थंडीने जोरदार प्रवेश केला आहे. राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये तापमानात २ ते ३ अंशांची अचानक घट झाल्याने शीतलहरीचा धोका निर्माण झाला आहे. या स्थितीचा परिणाम मध्य भारतातून महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यताही हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हवामानातील या अचानक बदलांमुळे आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तापमान झपाट्याने घसरल्यामुळे सर्दी-खोकला, दमा आणि वृद्ध नागरिकांमध्ये होणारा त्रास वाढू शकतो. त्यामुळे गरजेनुसार उबदार कपडे वापरणे आणि थंड हवेत अनावश्यक फिरणे टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!