Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धक्कादायक! लिफ्टमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून 9 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! लिफ्टमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून 9 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

Mumbai Crime News: मुंबईतील बोरिवली पूर्व परिसरात एका अत्यंत संतापजनक घटनेने खळबळ उडवून दिली आहे. एकाच इमारतीत राहणाऱ्या 65 वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने त्याच इमारतीमधील 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लिफ्टमध्ये केले घृणास्पद कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, ही निंदनीय घटना संध्याकाळच्या सुमारास घडली. पीडित मुलगी लिफ्टमधून घरी जात असताना, शेजारी राहणाऱ्या आरोपी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने तिला लिफ्टमध्ये खेचले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना लिफ्टमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. या फुटेजमुळे आरोपीचा गुन्हा उघडकीस आला.

हेही वाचा – Pune Crime: पुण्यात वकील महिलेची दहशत! गुंगीचे औषध पाजून तरुणावर लैंगिक अत्याचार; खाजगी क्षणांच्या फोटोंद्वारे ब्लॅकमेल

तात्काळ गुन्हा दाखल आणि अटक
अत्याचार झाल्यानंतर घाबरलेल्या मुलीने थेट आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या आईने क्षणाचाही विलंब न करता कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 65 वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अटक केली.

आरोपीला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
अटकेनंतर आरोपीला बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या गंभीर गुन्ह्याची दखल घेत आरोपीला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कस्तुरबा मार्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!