Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुण्यात वकील महिलेची दहशत! गुंगीचे औषध पाजून तरुणावर लैंगिक अत्याचार; खाजगी क्षणांच्या फोटोंद्वारे ब्लॅकमेल

Pune Crime: पुण्यात वकील महिलेची दहशत! गुंगीचे औषध पाजून तरुणावर लैंगिक अत्याचार; खाजगी क्षणांच्या फोटोंद्वारे ब्लॅकमेल

पुणे: पुण्यात सध्या तरूण संकटात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण, एका वकील महिलेने तरूणाला गुंगीचे औषध पाजून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कायदाक माहिती उघड झाली आहे. त्याशिवाय तरूण गुंगीत असताना त्याच्यासोबत अश्लील फोटो काढले आणि पैशांसाठी त्या फोटोंद्वारे त्याला अनेक दिवस ब्लॅकमेल केलं. हा सगळा प्रकार असहनीय झाल्यानंतर तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही घटना उघड झाली.

तक्रारीत दाखल केलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने कायद्याची भीती दाखवत तरुणाला सतत धमकावले. गुंगीच्या अवस्थेत अत्याचार केल्यानंतर त्याचे अश्लील फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैश उकळले. या मानसिक छळामुळे तरुण गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड तणावात होता.

हे प्रकरण पुण्यापुरते मर्यादित नव्हते. मूळचा कोल्हापूरचा असलेल्या पीडिताच्या घरीही आरोपी महिलेने हजेरी लावली आणि तिथेही जबरदस्तीचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर तिने तरुणाला वाराणसीला नेले आणि तिथेही दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद आहे. ब्लॅकमेल आणि बदनामीच्या भीतीने पीडित बराच काळ गप्प होता, पण अखेर धैर्य एकवटून त्याने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी महिलेविरुद्ध गुंगीचे औषध देणे, लैंगिक अत्याचार, खाजगी फोटोने ब्लॅकमेल, धमकी अशा अनेक गंभीर कलमांखाली कारवाई सुरू केली आहे. सध्या पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपी महिला फरार असल्याची माहिती आहे. या घटनेने पुण्यातील महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, समाजात मोठी खळबळ माजली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!