Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbra Accident: मुंब्रा बायपासवर भीषण अपघात! कंटेनरच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू

Mumbra Accident: मुंब्रा बायपासवर भीषण अपघात! कंटेनरच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू

Mumbra Accident: मुंब्रा येथील गावदेवी बायपासवर रविवारी एका भीषण कंटेनर अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. मृत तरुण कामानिमित्त आपल्या बाईकवरून बाहेर जात होते, त्यावेळी मोठ्या कंटेनरखाली आल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. मृतकांची वयमर्यादा 18 ते 23 वर्षे असून, त्यापैकी अफजल मोईनुद्दीन हसन हा दुचाकीस्वार होता. ते आपल्या ॲक्सिस ऍक्टिवा गाडीने शिळफाटा दिशेने प्रवास करत असताना ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच प्रवीण पवार यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि ॲम्बुलन्स यांना त्वरीत बोलावून मदत कार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी मोठ्या संख्येने धाव घेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणांना मदत केली. तरणांचे मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

ठाण्यात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

ठाण्यातील कशेळी ब्रिजवर मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अविनाश उतेकर (वय 43, रा. वांगणी) यांनी थेट खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर घटनास्थळी नारपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक धावत आले. त्यांनी उतेकर यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने त्याचा जीव वाचला असून, चेहरा आणि नाकाला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!