Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Teacher Recruitment Scam: शिक्षणाधिकाऱ्यांनीच लुटली तिजोरी! शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी रवींद्र काटोलकर यांना अटक

Teacher Recruitment Scam: शिक्षणाधिकाऱ्यांनीच लुटली तिजोरी! शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी रवींद्र काटोलकर यांना अटक

Teacher Recruitment Scam: शिक्षक भरती आणि पगार वाटपातील करोडो रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक केली आहे. ‘शालार्थ’ ऑनलाइन वेतन प्रणालीचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली असून, शिक्षण क्षेत्रात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या तक्रारीवरून हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला. तपासात असे समोर आले आहे की, शालार्थ प्रणालीमध्ये बेकायदेशीरपणे शिरकाव करून बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करण्यात आले. अस्तित्वात नसलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नावे वेतन काढून शासनाची सुमारे 12 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली. काटोलकर हे 2021 ते 2022 दरम्यान शिक्षणाधिकारी असताना, त्यांनी बनावट ओळखपत्रांची माहिती असूनही कोणतीही शहानिशा न करता पगाराचे प्रस्ताव मंजूर केले. दरम्यान, या प्रकरणी एसआयटीने आतापर्यंत एकूण 26 जणांना गजाआड केले आहे. यामध्ये शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, लिपिक, मुख्याध्यापक आणि शाळा संचालकांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – Punishment Ban for Teachers: विद्यार्थ्यांना शिक्षा केली तर शिक्षकांवरच होणार गुन्हा; राज्य सरकारची नवी कठोर नियमावली जारी

२५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेले रवींद्र शंकरराव काटोलकर यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांना 25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात त्यांच्याकडून या घोटाळ्यातील आणखी धागेदोरे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांना आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!