Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ladki Bahin Yojana: ‘मी मुख्यमंत्री असेपर्यंत योजना बंद होणार नाही…’; देवेंद्र फडणवीसांचा राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा

Ladki Bahin Yojana: ‘मी मुख्यमंत्री असेपर्यंत योजना बंद होणार नाही…’; देवेंद्र फडणवीसांचा राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा

Ladki Bahin Yojana: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परभणीतून विरोधकांवर जोरदार प्रहार करत महिला मतदारांना आश्वस्त केले. भाजपला मोठे बहुमत मिळाल्यानंतर ही योजना बंद होईल, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र, जोपर्यंत ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री पदावर आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही थांबणार नाही, असे महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केले.

‘लाडकी बहीण’ आता होणार ‘लखपती दीदी’

केवळ आर्थिक मदत देऊन थांबायचे नाही, तर महिलांना आत्मनिर्भर करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. फडणवीस म्हणाले, आतापर्यंत महाराष्ट्रात 50 लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. एकट्या परभणीतून मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी 1 लाख महिलांना लखपती बनवले आहे. या वर्षाखेर ही संख्या 1 कोटींपर्यंत नेण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. परभणी महापालिकेत भाजपचा महापौर बसल्यानंतर, एक वर्षानी मी जेव्हा कामाचा आढावा घ्यायला येईन, तेव्हा किती भगिनींना ‘लखपती’ केले, याचा हिशोब पहिला घेईन.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील महिलांना लखपती बनवणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

विकासाच्या आड येणाऱ्यांना नेस्तनाबूत करू

परभणीच्या मागासलेपणावर भाष्य करताना फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. प्रभावतीच्या या नगरीत आता केवळ इतिहासाच्या गप्पा मारून चालणार नाही, तर भविष्याचा मार्ग आपल्यालाच कोरायचा आहे. जे लोक परभणीच्या विकासाच्या आड येतील, त्यांना आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

इतिहासाचा सन्मान, पण भविष्याचा वेध

इतिहासात जगणारे लोक इतिहासातच संपून जातात. आपल्याला इतिहासाचा सन्मान ठेवून उज्ज्वल भविष्याची निर्मिती करायची आहे, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी परभणीकरांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!