Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सिंचनाच्या पाण्यासाठी आदर्श शेतकऱ्याची आत्महत्या; राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिले भावनिक पत्र

सिंचनाच्या पाण्यासाठी आदर्श शेतकऱ्याची आत्महत्या; राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिले भावनिक पत्र

देऊळगाव राजा: शिवणी आरमाळसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी लढा उभारणारे, राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला वैतागून १३ मार्चला आत्महत्या केली. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना उद्देशून चार पानांचे भावनिक पत्र लिहिल्यानंतर शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले.

पाण्यासाठी ही आपली आहुती असून, यापुढे एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही, यासाठी पाण्याची हमी द्या, अशी आर्त विनवणी ‘सुसाइड नोट’मध्ये करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळचे रहिवासी असलेले कैलास अर्जुनराव नागरे यांनी सिंचनाच्या पाण्यासाठी शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करला होता.

गावातील धरणाच्या पात्रात काही दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदारांच्या नावाने हे पत्र लिहिण्यात आले आहे. शेती आहुती मागतेय, कृपया पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पाण्याची हमी द्या, असा उल्लेख चिठ्ठी करण्यात आला आहे. ऐन होळीच्या सणालाच शेतकऱ्याने सरकारचे डोळे उघडण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याने शासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!