Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Amravati Accident : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला; बस-क्रूझरच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू, ९ प्रवासी जखमी

Amravati Accident : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला; बस-क्रूझरच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू, ९ प्रवासी जखमी

Amravati Accident : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अंजनगाव रोडवर शनिवारी (२५ ऑक्टोबर) दुपारी एका भीषण अपघाताने खळबळ उडवली. अमरावतीकडून अंजनगावकडे जाणाऱ्या प्रवासी बस आणि परतवाड्याकडून येणाऱ्या क्रूझर गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले.

जखमींमधील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भयंकर होता की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, क्रूझरचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिक आणि अमरावती ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू करत जखमींना वाहनांमधून बाहेर काढण्यात आले. क्रूझरचा चालक स्टेअरिंग आणि सीटमध्ये अडकलेला असल्याने स्थानिकांनी प्रयत्नपूर्वक त्याला बाहेर काढले.

जखमींना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून गंभीर जखमींना अमरावतीत हलवण्यात आले. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी पंचनामा करत अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली असून, प्राथमिक तपासात वेगावरून नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये क्रूझरमधील दोन जण आणि बसमधील एक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे, तर जखमींमध्ये बसचे अनेक प्रवासी आणि क्रूझरमधील एक महिला समाविष्ट आहे. या अपघाताने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली असून, रस्ता सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!