Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nagpur Crime: आष्टीच्या रुचिताचा नागपुरात करुण अंत; प्रियकराने ‘ओयो’ हॉटेलमध्ये बोलावलं अन्…

Nagpur Crime: आष्टीच्या रुचिताचा नागपुरात करुण अंत; प्रियकराने ‘ओयो’ हॉटेलमध्ये बोलावलं अन्…

Nagpur Crime: नागपुरातून अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. उपराजधानीतील कळमेश्वर रोडवरील फेटरी परिसरात एका हॉटेलमध्ये प्रेमसंबंधांचा रक्तरंजित अंत झाला आहे. अवघ्या २१ वर्षांच्या तरुणीची तिच्याच प्रियकराने हॉटेलच्या खोलीत गळा चिरून हत्या केल्याने नागपूर जिल्हा हादरला आहे. गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे हॉटेल व्यवसायातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?

मूळची आष्टी खुर्द येथील आणि सध्या गिट्टीखदान भागात राहणारी रुचिता राजेंद्र भांगे (वय २१) ही तिचा प्रियकर सौरभ जामगडे (वय २४) याच्यासोबत फेटरी येथील एका ओयो (OYO) हॉटेलमध्ये आली होती. दोघेही खोलीत गेल्यानंतर त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून तीव्र वाद झाला. रागाच्या भरात सौरभने आपल्याकडे असलेला चाकू काढून रुचिताच्या गळ्यावर वार केले.

हेही वाचा –Phaltan Murder Case: फलटण हादरलं! महिलेने पती आणि दुसऱ्या प्रियकरासोबत मिळून पहिल्या बॉयफ्रेंडचा काढला काटा; मृतदेहाचे तुकडे केलं अन्…

रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीचा मृत्यू

हा हल्ला इतका भीषण होता की, आरडाओरडा ऐकून हॉटेल कर्मचारी खोलीकडे धावेपर्यंत रुचिताचा प्रचंड रक्तस्राव झाला होता. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपी सौरभने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि तिथून पळ काढला.

पोलिसांचा तपास आणि शोधमोहीम

दरम्यान, पोलीस हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत असून आरोपी नेमका कोणत्या दिशेला पळाला याचा माग काढला जात आहे. कळमेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून फरार सौरभच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. रुचिताचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

वादाचे कारण अस्पष्ट

दरम्यान, दोघेही एकाच गावचे रहिवासी असून त्यांच्यात दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. मात्र, हॉटेलमध्ये नक्की कोणत्या विषयावरून वाद झाला आणि सौरभने टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलीस करत आहेत. शहरातील वाढत्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!