Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘आदिनाथ’सह प्रत्येक निवडणूक लढण्याचा संजय शिंदे गटाचा निर्धार

‘आदिनाथ’सह प्रत्येक निवडणूक लढण्याचा संजय शिंदे गटाचा निर्धार

करमाळा (सोलापूर): विधानसभा निवडणुकीनंतर काहीसा शांत असणारा करमाळ्याच्या राजकारणातील महत्वाचा माजी आमदार संजयमामा शिंदे गट जनता दरबाराच्या निमित्ताने प्रथमच विठ्ठल निवास येथे एकवटल्याचे दिसून आले. सकाळपासूनच राजुरी, कोर्टी भागातील विविध विकासकामांचा आढावा घेत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दुपारी जनता दरबाराला सुरुवात केली. संजय शिंदे पुन्हा अॅक्शन मोडवर आल्यामुळे करमाळ्याच्या राजकारणात पुन्हा चुरस निर्माण झाली आहे. शिंदे गट पुन्हा सज्ज होवून ‘आदिनाथ’ सह प्रत्येक निवडणुकीत पूर्ण ताकदीने सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट संकेत या निमित्ताने मिळाले.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर संजयमामा शिंदे गटाचे कार्यकर्ते निराश झाल्याचे चित्र होते. त्यात माजी आमदार संजयमामा शिंदे हेही काही काळ शांत राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. कार्यकत्यांमध्ये आलेली मरगळ माजी आमदार संजयमामा शिंदे अॅक्शन मोडवर दूर करुन त्यांना पुन्हा नव्या जोमाने कामाला लागण्याच्या सुचना या जनता दरबारादरम्यान माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दिल्या.

यावेळी शिंदे गटाचे मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक निवडणुकीचा अॅक्शन प्लॅन तयार होत असून महायुती सरकारच्या काळात मंजूर करुन आणलेली कोट्यवधींची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. किमान २ वर्ष ती कामे पूर्ण व्हायला वेळ लागेल. या विकासकामांसह पुढील काळात अनेक प्रलंबित योजना मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा माजी आमदार संजय शिंदे प्लॅनसह अॅक्शन मोडवर आले असून यामुळे त्यांच्या गटातील कार्यकत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!