Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यात मोठी खळबळ..! राष्ट्रवादी नेत्याच्या मुलावर बिबट्याचा हल्ला; प्रचारासाठी जात असताना घेतली अंगावर झेप

राज्यात मोठी खळबळ..! राष्ट्रवादी नेत्याच्या मुलावर बिबट्याचा हल्ला; प्रचारासाठी जात असताना घेतली अंगावर झेप

Leopard Attack in Satara : सातारा जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याने हल्ला केला आहे. या घटनेत अधिराज पाटील यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना कराड तालुक्यातील उंडाळे शेवाळवाडी मार्गावर शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. अधिराज पाटील हे आपल्या सहकारी धनाजी पाटील यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेतली. या हल्ल्यात अधिराज पाटील जखमी झाले, तर दुचाकी चालवत असलेले धनाजी पाटील थोडक्यात बचावले.

अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर हे येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आहेत. प्रचार आटोपून परतताना ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, उंडाळे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाकडे तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!