Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

रस्त्यावर गाडी उभी करून गांजाची विक्री, शुगर मिल-शिये रोडवर एलसीबीची कारवाई; ३ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त

रस्त्यावर गाडी उभी करून गांजाची विक्री, शुगर मिल-शिये रोडवर एलसीबीची कारवाई; ३ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त

कोल्हापूर : कसबा बावडा शुगर मिल ते शिये रोडवर रस्त्याकडेला दुचाकी उभी करून गांजाच्या पुड्या विक्री करणाऱ्या तरुणास एलसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ३ किलो गांजा, दुचाकी असा १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शनिवारी सकाळी ही कारवाई केली. सचिन शामराव पाटील (वय ३५, रा. शाहूनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथके नेमली आहेत. या पथकातील शुभम संकपाळ व विशाल चौगले यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, एक तरुण शुगर मिल ते शिये रोडवर रस्त्याकडेला दुचाकी उभी करून गांजाच्या लहान पुड्या करून विक्री करतो.

एलसीबीच्या पथकाने दोन दिवस या रोडवर गस्त चालू ठेवली होती. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास संशयित सचिन पाटील शिये रोडवर एका मंगल कार्यालयापासून थोड्या अंतरावर रस्त्याकडेला आपली दुचाकी उभी करून गांजा विक्री करत होता. ग्राहक त्यांच्याकडे येऊन गांजा घेऊन जात होते. पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे तब्बल ३ किलो १०० ग्रॅम गांजा सापडला.

हा गांजा त्याने कोठून आणला, त्याचे नियमित ग्राहक कोण आहेत, किती दिवसांपासून तो हा व्यवसाय करत होता, याची माहिती पोलीस घेत आहेत. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार अशोक पोवार, सचिन पाटील, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील, विलास किरोळकर, अरविंद पाटील, विजय इंगळे, संदीप बेद्रे, सागर माने, संजय कुंभार, महेश पाटील, महेश खोत, अमित सर्जे यांनी सहभाग घेतला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!