सोलापूर : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पतीने तिच्या डोक्यात कुऱ्हाड घालून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार, २० मार्च २०२५ रोजी नई जिंदगी परिसरातील सिध्देश्वर नगर भाग ३ येथे घडली. याप्रकरणी आरोपीच्या १४ वर्षीय मुलाने दस्तुरखुद्द बापाविरुध्द पोलिसात फिर्याद दाखल केली.
यातील आरोपी मैनुद्दिन अलीसाब पिरजादे याने आपली पत्नी शबाना पिरजादे हिच्या चारित्र्यावर संशय घेवून सतत शिवीगाळ करत होता. घटनेच्या दिवशी ‘तुझे जानसे मारता हूँ, तुझे जिंदा नही छोडुंगा’, असे म्हणत त्याने तिच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाड घातले. यात ती गंभीर जखमी झाली आहे.
याप्रकरणी अलिशा उर्फ अलमान मैनुद्दिन पिरजादे (वय-१४, रा. सिध्देश्वर नगर भाग ३, नई जिंदगी, सोलापूर) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन मैनुद्दिन पिरजादे (रा. सिध्देश्वर नगर ३, नई जिंदगी, सोलापूर) याच्याविरध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.


