करमाळा: करमाळा तालुक्यातील झरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार संजय शिंदे गटाच्या मंजुश्री मयूर मुसळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आपसात ठरल्याप्रमाणे मैना पोपट घाडगे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेऊन मुसळे यांची निवड करण्यात आली.
बुधावारी सरपंच निवड प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. यावेळी अकरा सदस्यांपैकी सात सदस्य हजर होते. माजी आमदार संजय शिंदे गटाच्या मंजुश्री मुसळे यांचा सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी निवड झाल्याची घोषणा दुपारी दोन वाजता निवडणूक अधिकारी भंडारे यांनी केली. निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ग्रामसेवक भुजबळ हे देखील उपस्थित होते.
या निवडीनंतर पॅनल प्रमुख प्रशांत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी नूतन सरपंच मुसळे यांचे अभिनंदन केले. यावेळी भीमराव घाडगे, बबन घाडगे, हनुमंत पाटील, सुनीता पाटील, पोपट घाडगे, सुरेश पाटील, संजय कांबळे, बाबासाहेब सरोदे , दिलीप कांबळे, सुदाम सरोदे, मनोज गरड, रामदास गायकवाड, अनिल मिटे, विजय माने, बाबासाहेब घाडगे, सोमनाथ घाडगे, बाळासाहेब घाडगे, किशोर पाटील, मयुर मुसळे, अशोक घाडगे, बंडू बोराटे, दिपक बोराटे, प्रदीप मिटे, बापू होनराव, संतोष मुरूमकर, संतोष शिंदे, अमोल मुसळे, प्रदीप घाडगे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


