Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

साताऱ्यात भीषण दुर्घटना! आयशर ट्रक ५० फूट दरीत कोसळला; चिमुकल्यासह ४ जणांचा जागीच मृत्यू

साताऱ्यात भीषण दुर्घटना! आयशर ट्रक ५० फूट दरीत कोसळला; चिमुकल्यासह ४ जणांचा जागीच मृत्यू

Satara News : सातारा तालुक्यातील कासरतळे येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. रस्त्याच्या कडेला उभा असलेला आयशर ट्रक अचानक ५० फूट खोल दरीत कोसळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलासह तीन महिलांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुनर्वसन झाल्यानंतर संबंधित कुटुंब आपले घरगुती साहित्य ट्रकमध्ये भरून नवीन ठिकाणी स्थलांतर करत होते. सर्व सामान भरल्यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना अचानक तोल जाऊन वाहन थेट खोल दरीत कोसळले. हा अपघात इतका अचानक घडला की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.

ट्रकमध्ये संसारोपयोगी साहित्याबरोबरच काही पाळीव जनावरेही होती. या अपघातात काही जनावरांचाही मृत्यू झाला आहे. मात्र, ट्रक चालक या दुर्घटनेतून बचावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघाताचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दोन गंभीर जखमींना तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!