Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

चक्क मुलाच्या पापणीतून काढले ३० जिवंत किडे; गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील घटना

चक्क मुलाच्या पापणीतून काढले ३० जिवंत किडे; गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील घटना

अमरेली : एका ८ वर्षांच्या मुलाच्या पापणीतून तब्बल ३० जिवंत किडे आणि ३५ हून अधिक अंडी बाहेर काढण्यात आली आहेत. गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला येथील लल्लूभाई सेठ आरोग्य मंदिर हॉस्पिटलमध्ये दीड तासाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर हे किडे आणि अंडी यशस्वीरीत्या काढण्यात आली.

सावरकुंडला येथील १०० टक्के मोफत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नुकताच नेत्ररोग विभाग सुरू झाला आहे. डोळ्यात दुखत असल्याची तक्रार घेऊन आलेल्या या ८ वर्षांच्या मुलाची याच विभागात तपासणी करण्यात आली. डॉ. मृगांक पटेल यांनी तपासणी केली असता, मुलाच्या पापणीत परजीवी म्हणजेच सामान्य भाषेत ज्यांना डोक्यातील उवा म्हणतात, ते असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे, इंजेक्शन न देता फक्त ड्रॉप्सच्या मदतीने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली, असे डॉक्टरांनी सांगितले. या शस्त्रक्रियेत सुमारे ३० परजीवी किडे आणि ३५ अंडी बाहेर काढण्यात आली. लहान मुलांमध्ये अशी प्रकरणे सामान्यपणे दिसत नाहीत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!