ओटावा : दक्षिण कोरियात विमान दुर्घटनेची घटना घडलेली असतानाच कॅनडातही एक विमान धावपट्टीवर उतरताना, पेटल्याची घटना रविवारी समोर आली. वेळीच सर्व प्रवाशांना सुखरूपपणे उतरविण्यात आल्याने या घटनेत जीवित हानी टळली.
न्यू फाऊन्डलॅन्ड बेटावरील सेन्ट जॉन शहराहून झेपावलेले एअर कॅनडाचे एक विमान हेलीफेंक्स विमानतळावर उतरताना धावपट्टीवर घसरल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यावेळी विमानाच्या काही भागाने पेट घेतल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक वेळेनुसार रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर एअर कॅनडाच्या विमान क्रमांक २२५९ मधील सर्व प्रवाशांना तत्काळ सुरक्षितरीत्या विमानातून बाहेर काढण्यात आल्याचे विमान कंपनीने निवेदनातून म्हटले. यावेळी विमानात नेमके किती प्रवासी व चालक दल सदस्य होते, याचा आकडा मात्र कंपनीने जारी केलेला नाही, या दुर्घटनेमुळे विमानतळ शनिवारी रात्रीपासून तात्पुरते बंद ठेवण्यात आले.


