Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

देशात सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब

देशात सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब

आसाम:  देशातील सर्वात मोठ्या अवयव तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश आसाममधून झाला आहे. आसाममधील (Assam News) नागावमधील कैवर्त या छोट्याशा गावाची लोकसंख्या 2,200 आहे. इथे असलेला प्रत्येकजण एकाच किडनीवर जगत आहे. गावातील 40 टक्के लोकांना फक्त एकच किडनी आहे. ड्रग्जच्या व्यसनामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे या लोकांनी त्यांची एक किडनी विकली आहे. त्यांना कोलकाता येथे घेऊन जातात, जिथे शस्त्रक्रियेनंतर त्यांची एक किडनी काढली जाते. या प्रकरणात पोलिसांनी तीन तस्करांना अटक केली आहे. धरनी दास, महेंद्र दास आणि दीपदास अशी त्यांची नावे आहेत. गावातील 20 टक्के लोक नोकरी करतात, तर 10 टक्के लोक शेती करतात. उर्वरित बेरोजगार आहेत. बैठकीत असे उघड झाले की सरकारी योजनांचे फायदे मिळत असूनही, गावकरी आर्थिक अडचणीत होते, म्हणून त्यांनी 3 ते 6 लाख रुपयांना दलालांना किडनी विकली.

वैद्यकीय तपासणीसाठी नेले अन् किडनी काढली

दुसऱ्या पीडिताने सांगितले की, “आम्हाला वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली कोलकाताला नेण्यात आले. नंतर, भुलीचे औषध दिले. किडनी काढल्या गेल्या. आम्हाला काही महिन्यांनंतरच कळले. आमच्यासारख्या अनेक पीडिता आहेत. 

गावकरी म्हणाले, भावनिक खेळ 

गावातील काही विवाहित महिला त्यांच्या माहेरी गेल्या तेव्हा त्यांच्या पतींना दलालांनी भावनिकरित्या कैद केले.  त्यांना कमिशन आणि नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या किडनी विकण्यास प्रवृत्त केले. 2020 च्या लॉकडाऊन दरम्यान, मोरीगाव जिल्ह्यातील दक्षिण धरमतुलमध्ये अशाच प्रकारच्या अवयव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्या प्रकरणात वीस गरीब लोक अडकले होते. गुवाहाटी येथील लिलीमाई बडा नावाच्या महिलेला सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली होती

महिलांच्या किडनीही काढल्या

हुज-कब्बरटाच्या गावप्रमुखांच्या मते, हा बेकायदेशीर व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे. गरिबी, अवैध दारूचा व्यापार आणि किडनी विकण्याची सक्ती यामुळे गावाचे रूपांतर अपंगांच्या समाजात होत आहे. रहिवाशांनी सांगितले की अनेक घरांमध्ये पती-पत्नी दोघांनीही प्रत्येकी एक किडनी विकली आहे. जर कुटुंबात पाच सदस्य असतील तर तिघांनी आधीच त्यांची किडनी विकली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!