Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आता संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार दरमहा 2500 रुपये

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आता संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार दरमहा 2500 रुपये

मुंबई: महाराष्ट्र सरकारने निराधार, वृद्ध आणि अपंग व्यक्तींना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारी मासिक आर्थिक मदत 1500 रुपयांवरून 2500 रुपयांपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली. जरी याबाबतचा अधिकृत सरकारी आदेश अद्याप प्राप्त झालेला नसला तरी ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे हजारो निराधार, अपंग, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, फक्त बुलढाणा जिल्ह्यातील 2.35 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होईल. नागपूर जिल्ह्यातही विशेष सहाय्य योजनेंतर्गत 2,35,305 लाभार्थी असून त्यापैकी 1,81,908 जण राज्य सरकारच्या या योजनांचा लाभ घेतात.

पुण्यातील पहिला गँगवॉर अन् आंदेकर टोळीचा रक्तरंजित चार दशकांचा इतिहास; वाचा

या वाढीमुळे लाभार्थ्यांचे दैनंदिन जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. खामगावचे तहसीलदार सुनील पाटील यांनी सांगितले की, श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक मदत 2500 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र सरकारचा अधिकृत आदेश अद्याप प्रतीक्षेत आहे.

अर्ज कुठे करावा?

  • तहसीलदार कार्यालय
  • जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखा
  • आपले सरकार पोर्टल (ऑनलाईन अर्ज)

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजना ही राज्य सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. यामध्ये निराधार, वृद्ध, अनाथ, अपंग आणि इतर वंचित घटकांना मासिक आर्थिक सहाय्य दिले जाते. समाजातील दुर्बल घटकांना आधार देऊन त्यांच्या जगण्याची गुणवत्ता सुधारावी हा यामागील उद्देश आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!