नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) 7 कोटींहून अधिक सदस्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये सदस्यांना त्यांच्या ईपीएफ खात्यातील 100 टक्के रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या Central Board of Trustees च्या बैठकीत पैसे काढणे, व्याजदर, दंड सवलत आणि डिजिटल सेवांमध्ये सुधारणा मंजूर झाल्या.
एका सुलभ नियमात 13 जटिल तरतुदी
- EPFO ने पैसे काढण्याचे 13 गुंतागुंतीचे नियम रद्द करून त्यांना तीन सोप्या श्रेणींमध्ये वर्गीकृत केले
- आवश्यक गरजा (उदा. आजारपण, शिक्षण, विवाह)
- घर खरेदी/बांधकाम
- विशेष परिस्थिती (उदा. बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती)
100 टक्के रक्कम काढण्याची सुविधा
- सदस्य आता खात्यातील संपूर्ण पात्र रक्कम काढू शकतील.
- शिक्षणासाठी 10 वेळा, विवाहासाठी 5 वेळा पैसे काढण्याची मर्यादा.
- किमान सेवा कालावधी 12 महिन्यांवर आणला.
- विशेष परिस्थितीत कारण न देता पैसे काढण्याची सोय.
- खात्यात 25 टक्के रक्कम कायम ठेवल्यास 8.25% व्याज आणि कंपाउंड इंटरेस्ट मिळेल.
पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया
- पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित आणि डिजिटल.
- फायनल सेटलमेंटची मुदत 2 महिन्यांवरून 12 महिन्यांपर्यंत.
- पेंशन काढण्याची मुदत 2 महिन्यांवरून 36 महिन्यांपर्यंत वाढवली.
‘विश्वास योजना’द्वारे दंडात सवलत
- 2,406 कोटींची दंड रक्कम आणि 6,000+ खटल्यांचा निपटारा.
- उशीर झाल्यास दंड 1% प्रति महिना (2 महिन्यांसाठी 0.25%, 4 महिन्यांसाठी 0.50%).
- योजना 6 महिन्यांसाठी लागू, गरजेनुसार 6 महिने वाढवता येईल.
डिजिटल लाइफ सर्टिफिकेट
- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेशी (IPPB) कराराद्वारे EPS-95 पेंशनर्स घरबसल्या मोफत डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकतील.
EPFO 3.0: डिजिटल क्रांती
- ‘EPFO 3.0’ क्लाउड-बेस्ड फ्रेमवर्कमुळे सेवा जलद, पारदर्शक आणि स्वयंचलित.
गुंतवणुकीसाठी चार फंड मॅनेजर्सची 5 वर्षांसाठी नेमणूक.
प्रमुख निर्णय
- 100 टक्के रक्कम काढण्याची मुभा.
- 13 नियमांचे 3 सोप्या श्रेणींमध्ये एकत्रीकरण.
- शिक्षण/विवाहासाठी जास्त वेळा काढण्याची सुविधा.
- किमान सेवा कालावधी 12 महिने.
- कारण न देता पैसे काढण्याची सोय.
- 25% रक्कम ठेवल्यास व्याजाचा लाभ.
- ‘विश्वास योजना’द्वारे दंडात कपात.
- मोफत डिजिटल लाइफ सर्टिफिकेट.
- EPFO 3.0 मुळे जलद डिजिटल सेवा.


