Today सोमवार, 20th एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Famous Actress Death : भीषण अपघातात प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; कार डिवाइडरला आदळून उलटली

Famous Actress Death : भीषण अपघातात प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; कार डिवाइडरला आदळून उलटली

Famous Actress Death : मनोरंजन क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया यांचे भीषण रस्ते अपघातात निधन झाले आहे. जयपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, जयपूरमधील शिप्रा पथ रोडवर रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. कामावरून घरी परतत असताना हर्षिल कालिया यांच्या कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी डिव्हायडरला जोरात धडकून उलटली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करत गाडी सरळ केली आणि त्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. वाहनाचा वेग जास्त होता का, किंवा इतर कोणत्या वाहनामुळे अपघात झाला का, याचा तपास केला जात आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

हर्षिल कालिया यांनी ‘Crime Next Door’ या वेब सिरीजमध्ये काम केले होते. त्याचबरोबर त्यांनी न्यूज अँकर म्हणूनही काम केले होते आणि अनेक राजस्थानी गाण्यांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. अलीकडे त्या मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!