Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dombivli News : नाशिकनंतर डोंबिवलीत भोंदूबाबाचा कारनामा उघड; लग्नाचा दोष काढतो म्हणत वृद्धाची फसवणूक, आरोपी अटकेत

Dombivli News : नाशिकनंतर डोंबिवलीत भोंदूबाबाचा कारनामा उघड; लग्नाचा दोष काढतो म्हणत वृद्धाची फसवणूक, आरोपी अटकेत

Dombivli News : नाशिकमधील अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच आता डोंबिवली येथेही अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या लग्नातील अडथळे दूर करण्याचे आमिष दाखवत एका भोंदू बाबाने वयोवृद्ध व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी दीपक सावंत या आरोपीला कल्याण परिसरातून अटक केली आहे.

माहितीनुसार, पीडित व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नात अडचणी येत असल्याने उपाय शोधत होते. याचाच फायदा घेत आरोपी दीपक सावंत याने स्वतःला ‘बाबा’ म्हणून सादर करत विशेष विधी करून दोष दूर करण्याचे आश्वासन दिले.

विधीच्या नावाखाली त्याने पीडितांकडून सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची लक्ष्मी नाणी घेतली. त्यानंतर हे दागिने लाल रंगाच्या रुमालात ठेवण्यास सांगून चलाखीने रुमालाची अदलाबदल केली आणि दुसरा रुमाल देत तेथून पसार झाला.

काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता अशा भोंदू बाबांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!