ग्वाल्हेर (मध्य प्रदेश): पती हातात पूर्ण पगार देईल. मी त्याला त्याच्या दैनंदिन खर्चासाठी पैसे देईन. तो खरेदी केलेला भूखंड गहाण ठेवणार नाही. जरी ठेवावा लागला, तरी माझी लेखी संमती घ्यावी लागेल. एवढेच नाही तर माझ्या बोलण्यावर तो हसणार नाही… अशा अनेक अटी पत्नीने पतीसमोर ठेवल्या. पतीने अटी मान्य केल्या आणि पाच वर्षांपासून वेगळे राहत असलेले जोडपे पुन्हा एकत्र आले. आता दोघेही एप्रिलपासून एकत्र राहतील.
ग्वाल्हेरच्या या महिलेचे लग्न नोव्हेंबर २००७ मध्ये झाले. काही काळ पती-पत्नीमध्ये सर्व काही ठीक होते; परंतु काही वर्षांनी त्यांच्यात वाद निर्माण होऊ लागले. यावर ती महिला २०२० मध्ये घराबाहेर पडली. तिने तिच्या मुलाला सोबत घेतले आणि दोन्ही मुलींना पतीकडे सोडले.
नवऱ्याने या अटी मान्य केल्या…
१. जर घर बांधण्यासाठी कर्जाची आवश्यकता असेल तर ते दोघेही संयुक्तपणे घेतील.
२. जर मालमतेत गुंतवणूक केली तर दोघेही भागीदार असतील.
३. प्लॉटचे कर्ज फेडल्यानंतर तीन वर्षांनी स्वतःचे नवीन घर बांधायचे


