Today मंगळवार, 25th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संभाजीनगरमध्ये अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेर राडा! महिला कार्यकर्त्याला भोवळ; तिकीट नाकारल्याने महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

संभाजीनगरमध्ये अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेर राडा! महिला कार्यकर्त्याला भोवळ; तिकीट नाकारल्याने महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sambhajinagar Election: महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन तास शिल्लक असताना, छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती तुटल्यानंतर निष्ठावंतांना उमेदवारीची आशा होती, मात्र ऐनवेळी नावे कापली गेल्याने मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाला गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तथापी, भाजपच्या कट्टर कार्यकर्त्या दिव्या मराठे यांनी थेट पक्षाच्या कार्यालयाबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

तब्बल १५-२० वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना जेव्हा उमेदवारी नाकारल्याचे समजले, तेव्हा संतापाचा उद्रेक झाला. वॉर्ड क्रमांक २२ मधील इच्छुक उमेदवाराला आणि त्यांच्या पत्नीला भररस्त्यात रडू कोसळले. तथापी, शिवाजीनगर भागातील एक महिला कार्यकर्ता स्वतःच्या कष्टाचा पाढा वाचताना रडत-रडत बेशुद्ध पडली. भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या लता दलाल यांच्यासह अनेक जुन्या चेहऱ्यांना डच्चू मिळाल्याने कार्यकर्त्यांनी भाजपच्या तंबूतच ठिय्या मांडला.

हेही वाचा – Rupali Patil Thombre: शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला ब्रेक; अखेर रुपाली ठोंबरे ‘या’ पक्षाच्या तिकिटावर लढणार निवडणूक

गंभीर आरोपांनी खळबळ

केवळ नाराजीच नाही, तर यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “आम्ही रक्ताचे पाणी करून पक्ष वाढवला, आंदोलनांच्या केसेस अंगावर घेतल्या. पण आज निष्ठावंतांना डावलून, जाड पाकीट देणाऱ्या नवीन उपऱ्यांना उमेदवारी विकली गेली,” असा खळबळजनक आरोप संतापलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला. मंत्री अतुल सावे यांना जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवल्याने मोठा संघर्ष झाला.

भाजपसमोर मोठे आव्हान
पक्षाने विश्वासघात केल्याची भावना व्यक्त करत अनेक इच्छुकांनी आता ‘अपक्ष’ लढण्याचे रणशिंग फुंकले आहे. “आम्ही निवडणूक जिंकू किंवा न जिंकू, पण भाजपच्या अधिकृत उमेदवाराला नक्कीच पाडू,” असा उघड इशारा एका महिला उमेदवाराने दिला आहे. संभाजीनगरमधील अनेक प्रभागांत आता भाजपला विरोधकांपेक्षा स्वकीय बंडखोरांचाच जास्त धोका निर्माण झाला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!