Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

छत्रपती शिवाजी महाराजांचा सीबीएसईकडून अवमान, 2200 पानी इतिहासाच्या पुस्तकात केवळ 68 शब्द; आमदार भावना गवळींकडून सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर

छत्रपती शिवाजी महाराजांचा सीबीएसईकडून अवमान, 2200 पानी इतिहासाच्या पुस्तकात केवळ 68 शब्द; आमदार भावना गवळींकडून सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर

मुंबई: राज्यात आणि केंद्रात हिंदुत्वावादी सरकार असताना सीबीएसईच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केवळ ६८ शब्द आहेत. हा महाराजांचा अवमान आहे, अशा शब्दांत शिवसेना आमदार भावना गवळी यांनी आपल्याच सरकारकडे रोष व्यक्त केला आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सीबीएसईच्या इतिहासाची २२०० पान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यात फक्त ६८ शब्दच असणे, हे निषेधार्थ आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातल्या, देशातील मुलांपर्यंत सीबीएसईच्या माध्यमातून गेला पाहिजे. सरकारने यासंदर्भात एनसीईआरटी मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा समावेश केला जावा, यासाठी प्रस्ताव पाठवला. इतक्या गंभीर मुद्द्यावर केवळ प्रस्ताव पाठवून हात झटका सरकारची यामागे उदासीनता दिसून येते, अशा शब्दांत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराजांबाबत सुरू असलेल्या दुर्लक्षावरून सरकारवर ताशेरे ओढले. आमदार गवळी यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. सीबीएसईचा पॅटर्न हा कित्येक वर्षापासून इंग्रजी शाळांत राबवला जात आहे, तरीही शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. हिंदुत्ववादी सरकारची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे. त्यामुळे अजून किती दिवस लागणार अभ्यासक्रम सीबीएसईमध्ये समाविष्ट करण्यासाठी? असा सवाल विचारला. दिल्लीत धर्मेद्र प्रधान मंत्री असून सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.

राज्यमंत्री पंकज भोयर यांनी परिषदेतील प्रश्नांना उत्तरे दिली. सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहास अपुरा आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय मंत्री यांना भेटून सविस्तर व अभ्यासपूर्ण इतिहासाचा समावेश करावा, अशी विनंती केली. त्यांनी अभ्यासक्रम समाविष्ट करण्याबाबत आश्वासन दिले आहे. पुढील काळात यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल. आवश्यक वाटल्यास केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत ठाण मांडू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!