Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ZP Election 2026: निवडणूक आयोगाला मोठा दिलासा! राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांना सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत होणार निवडणुका

ZP Election 2026: निवडणूक आयोगाला मोठा दिलासा! राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांना सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत होणार निवडणुका

SC On ZP Election: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचा प्रदीर्घ काळ सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. ३१ जानेवारीची कडक मुदत पाळताना प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला १५ दिवसांची महत्त्वाची मुदतवाढ दिली आहे. मात्र, या निर्णयासोबतच राज्याच्या ग्रामीण राजकारणाचे आता दोन स्पष्ट भाग पडले आहेत. आरक्षण मर्यादेच्या तांत्रिक मुद्द्यामुळे काही ठिकाणी गुलाल उधळला जाणार आहे, तर काही ठिकाणी मतदारांना मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

12 जिल्हा परिषदांमध्ये लवकरच बिगुल वाजणार

राज्यातील ज्या १२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची एकूण टक्केवारी ५० टक्क्यांच्या मर्यादेत आहे, तिथे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये आणि संबंधित १२५ पंचायत समित्यांमध्ये याच आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या नवीन आदेशानुसार, १५ फेब्रुवारीपूर्वी या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर असेल. यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ग्रामीण महाराष्ट्रात राजकीय हालचालींना उधाण येईल.

दुसरीकडे, राज्यातील ३२ पैकी २० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. या जिल्ह्यांमधील निवडणुका आता लांबणीवर पडल्या आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा असल्याने या काळात निवडणुका घेणे अशक्य आहे. त्यामुळे या २० जिल्हा परिषदा आणि उर्वरित पंचायत समित्यांसाठी एप्रिल किंवा मे महिन्यात मतदान होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – Pune PMC Election : पुण्यातील ‘या’ भागांतील निकाल लागणार सर्वात आधी; प्रशासनाची तयारी पूर्ण

यंत्रणेला दिलासा, राजकीय पक्षांची धाकधूक

निवडणूक आयोगाने न्यायालयाकडे अतिरिक्त १५ दिवसांची मागणी केली होती, कारण एकाच वेळी महापालिका आणि जिल्हा परिषदांचे नियोजन करणे यंत्रणेसाठी जिकिरीचे ठरत होते. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्यामुळे आता निवडणूक आयोगाला सुटसुटीतपणे नियोजन करता येईल. या मुदतवाढीमुळे महापालिका निवडणुकांच्या निकालांचा प्रभाव ग्रामीण भागातील मतदानावर पडण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांनी आता आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!