Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संभाजीनगर महानगरपालिकेत महिलांचा दबदबा! महिला उमेदवारांसाठी 58 जागा राखीव

संभाजीनगर महानगरपालिकेत महिलांचा दबदबा! महिला उमेदवारांसाठी 58 जागा राखीव

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Reservation: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Election) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. शहरातील 29 प्रभागांतून 115 नगरसेवकांची निवड होणार असून, यातील 58 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर 57 जागा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी असतील.

  • महिलांसाठी राखीव एकूण जागा – 58
  • सर्वसाधारण महिला – 30
  • ओबीसी महिला – 16
  • अनुसूचित जाती महिला – 11
  • अनुसूचित जमाती महिला – 1
  • खुल्या जागा – 57
  • सर्वसाधारण पुरुष – 30
  • ओबीसी पुरुष – 15
  • अनुसूचित जाती पुरुष – 11
  • अनुसूचित जमाती पुरुष – 1

आरक्षणाची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य आले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांचे आरक्षण त्यांच्या अपेक्षेनुसार निघाल्याने आनंदाचे वातावरण आहे. काही प्रभागांमध्ये मात्र आरक्षण बदलल्यामुळे संभाव्य उमेदवारांना प्रभाग बदलावा लागू शकतो. प्रभाग रचनेनुसार, प्रत्येक प्रभागात दोन महिला आणि दोन पुरुष उमेदवार असण्याची शक्यता असल्याने पक्षांमध्ये “अॅडजस्टमेंट” होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – राजकीय गणित बदललं! परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

या आरक्षण सोडतीनंतर काही प्रभागांत पूर्वीचे पुरुष नगरसेवक यावेळी त्यांच्या पत्नींना उमेदवारी देऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, माजी महापौर नंदकुमार घोडले यांच्या क्रमांक 29 प्रभागाचे आरक्षण ओबीसी आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे घोडले यांना या प्रभागातून निवडणूक लढवता येणार नाही. परिणामी, त्यांची पत्नी आणि माजी महापौर अनिता घोडले या आता या प्रभागातून उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार ठरू शकतात. राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील टप्प्यांसाठी तयारी सुरू झाली असून, अंतिम प्रभाग आरक्षण आणि हरकतींच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!