Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राजकीय गणित बदललं! परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

राजकीय गणित बदललं! परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

परभणी: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी वेगात सुरू झाली असून, आज परभणी शहर महानगरपालिकेसह राज्यातील काही प्रमुख महापालिकांसाठी जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. राज्य शासनाच्या नियमानुसार महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू असल्याने यंदाच्या निवडणुकीत निम्म्या जागांवर महिला उमेदवार मैदानात उतरणार आहेत. याशिवाय, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून मिळालेल्या आरक्षणाचा फायदा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांना होणार आहे.

परभणी महानगरपालिकेच्या एकूण ६५ जागांसाठी आरक्षण निश्चिती बी. रघुनाथ सभागृहात पार पडली. आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोडतीदरम्यान २०१७ च्या तुलनेत ओबीसी प्रवर्गातील एक जागा घटली, तर खुल्या प्रवर्गातील एक जागा वाढली आहे. नवीन आरक्षण जाहीर होताच सभागृहात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. काहींच्या प्रभागात आरक्षण बदल झाल्याने नाराजीचे सूर उमटले, तर काहींसाठी आरक्षण अनुकूल ठरल्याने आनंदाचे वातावरण होते. विशेषतः तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

हेही वाचा – BMC Ward Reservation: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; महिला उमेदवारांसाठी 114 प्रभाग राखीव!

परभणी मनपा २०२५ आरक्षण स्थिती

  • एकूण जागा : ६५
  • खुला प्रवर्ग : २०
  • खुला प्रवर्ग महिला : १९
  • अनुसूचित जाती : ८ (४ महिला)
  • अनुसूचित जमाती (महिला) : १
  • ओबीसी : १७ (९ महिला)

आरक्षण सोडत पार पडल्याने आता इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी अधिक रंगणार असून, परभणी महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!