Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात कडेकोट सुरक्षा! दगडूशेठ गणपती मंदिरासह प्रमुख स्थळांवर वाढवली दक्षता

दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात कडेकोट सुरक्षा! दगडूशेठ गणपती मंदिरासह प्रमुख स्थळांवर वाढवली दक्षता

पुणे: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर महाराष्ट्रात उच्चस्तरीय सतर्कता जारी करण्यात आली आहे. या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात आल्या आहेत.

पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात कडक सुरक्षा उपाय लागू करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात बॉम्ब शोध पथक, दंगलविरोधी पथक आणि विशेष निगराणी गट तैनात करण्यात आले आहेत. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची कसून तपासणी केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या भागात २४ तास गस्त सुरू राहणार आहे.

याशिवाय, पुणे मेट्रोमधील सिव्हिल कोर्ट स्टेशनवरही कडक तपासणी सुरू आहे. बॉम्ब निकामी पथक आणि मेट्रो सुरक्षा दल सतत परिसराची पाहणी करत आहेत. सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मेट्रो स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मुंबईतही रेल्वे स्थानके, विमानतळ, मॉल्स आणि समुद्रकिनाऱ्यावरील चौक्या याठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नागपूरसह राज्यातील सर्व विमानतळांवर प्रवाशांची काटेकोर तपासणी केली जात आहे.

हेही वाचा – दोषींना सोडलं जाणार नाही; दिल्ली बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, दिल्लीतील फॉरेन्सिक तपासात अमोनियम नायट्रेट-आधारित स्फोटकांचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेच्या तपासाची सूत्रे NIA आणि NSG या राष्ट्रीय तपास संस्थांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. तपासकर्ते उत्तर आणि पश्चिम भारतातील दहशतवादी नेटवर्कशी संभाव्य संबंधांचा शोध घेत आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा.”

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!