दुबई: आज भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करत आहे. दोन्ही संघ जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. या स्पर्धेत भारत अपराजित राहिला आहे आणि कांगारू संघाविरुद्ध विजयी लय कायम ठेवून सलग तिसऱ्या आयसीसी मर्यादित षटकांच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात सलग १४ व्यांदा नाणेफेक गमावली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. मॅथ्यू शॉर्टची जागा कूपर कॉनोलीने घेतली आहे, तर स्पेन्सर जॉन्सनच्या जागी तनवीर सांघा आला आहे. भारतीय संघाने प्लेइंग-११ मध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.
भारतः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
ऑस्ट्रेलियाः कूपर कोनोली, ट्रेविस हेड, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), एलेक्स कैरी, ग्लेन मैक्सवेल, बेन ड्वारशुइस, नाथन एलिस, एडम जैम्पा, तनवीर सांघा


