Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ICC T20 World Cup 2026: T20 विश्वचषकातून बांगलादेशची हकालपट्टी; स्कॉटलंडला मिळाली संधी

ICC T20 World Cup 2026: T20 विश्वचषकातून बांगलादेशची हकालपट्टी; स्कॉटलंडला मिळाली संधी

ICC T20 World Cup 2026: आगामी T20 विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेश क्रिकेट संघाला या स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर केले आहे. त्यांच्या जागी आता स्कॉटलंड संघाला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येण्यास नकार देणे बांगलादेशला महागात पडले असून, आयसीसीने शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. बांगलादेशने सुरक्षेचे कारण पुढे करत भारतात प्रवास करण्यास असमर्थता दर्शवली होती. आयसीसीने बीसीबीला अंतिम निर्णय घेण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता, मात्र बांगलादेशने त्याकडे दुर्लक्ष केले.

प्रोटोकॉलचे उल्लंघन

आयसीसीशी चर्चा करण्याऐवजी बांगलादेशने परस्पर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, जे नियमांचे उल्लंघन मानले गेले. बांगलादेशने या निर्णयाविरोधात ‘विवाद निवारण समिती’कडे दाद मागितली होती, परंतु तिथेही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.

स्कॉटलंडची ‘लॉटरी’ का लागली?

स्पर्धा सुरू व्हायला अवघे १५ दिवस शिल्लक असताना आयसीसीने स्कॉटलंडची निवड केली. पात्र न ठरलेल्या संघांमध्ये स्कॉटलंड आयसीसी टी-२० क्रमवारीत सर्वात वरच्या स्थानी आहे. मोठ्या संघांविरुद्ध स्कॉटलंडने अलीकडेच प्रभावी खेळी केली आहे. वेळेची कमतरता लक्षात घेता, स्कॉटलंड संघ तातडीने भारतात दाखल होण्यास तयार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!