Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आशिया कप दरम्यान ICC ची मोठी घोषणा; मोहम्मद सिराज विशेष पुरस्काराने सन्मानित

आशिया कप दरम्यान ICC ची मोठी घोषणा; मोहम्मद सिराज विशेष पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली: आशिया कप 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजबाबत आनंदाची बातमी समोर येत आहे. आयसीसीने त्याला ऑगस्ट महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ म्हणून सन्मानित केले आहे. सिराज सध्या आशिया कपमध्ये खेळत नसला तरी इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतल्या त्याच्या संस्मरणीय गोलंदाजीमुळे त्याने हा मान पटकावला. सिराजने या पुरस्कारासाठी न्यूझीलंडचा मॅट हेन्री आणि वेस्ट इंडिजचा जेडेन सील्स यांना मागे टाकले.

निर्णायक पाचव्या कसोटी सामन्यात त्याने एकूण 9 विकेट्स घेत भारताला फक्त 6 धावांनी विजय मिळवून दिला. पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे भारताने मालिका 2-2 अशी बरोबरीत नेली आणि अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी राखण्यात यश मिळवले.

दरम्यान, पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना सिराज म्हणाला की, ‘हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण मालिकांपैकी एक होती. या आव्हानात्मक परिस्थितीत मी संघाला योगदान देऊ शकलो, याचा मला अभिमान आहे.’ तथापी, त्याने आपल्या सहकाऱ्यांचे आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानत हा पुरस्कार त्यांचाही असल्याचे सांगितले.

याशिवाय, महिला श्रेणीमध्ये, आयर्लंडची अष्टपैलू ओर्ला प्रेंडरगास्ट हिला ऑगस्ट महिन्याची प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले. पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत तिने 144 धावा केल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. तसेच युरोप पात्रता स्पर्धेत एकूण 244 धावा आणि 7 विकेट्स घेतल्या. ओर्लानेही पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त करून आयसीसी, मतदार, सहकाऱ्यांचे आणि स्टाफचे आभार मानले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!