Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या परजीवीचा कहर! आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या परजीवीचा कहर! आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू

केरळ: केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबामुळे पसरणाऱ्या अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस या प्राणघातक आजाराने भीतीचं सावट निर्माण केलं आहे. गेल्या नऊ महिन्यांत या आजाराने राज्यात 17 जणांचा बळी घेतला असून त्यापैकी 7 मृत्यू या महिन्यातच झाले आहेत. या आजाराचा संसर्ग नेमका कसा होतो याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सुरुवातीला असा समज होता की तलाव, नद्या किंवा स्विमिंग पूलमध्ये पोहणाऱ्या लोकांना हा आजार होतो, पण नवजात बाळासह घरच्या घरी आंघोळ करणाऱ्या लोकांनाही संसर्ग झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे तज्ज्ञ चिंतेत आहेत.

आरोग्य विभागाच्या मते, केरळमध्ये मृत्युदर सुमारे 24 टक्के आहे, तर जागतिक पातळीवर तो तब्बल 97 टक्के आहे. तरीसुद्धा संसर्ग टाळण्यासाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. खबरदारी म्हणून पोहताना किंवा आंघोळ करताना नाकात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांचे आवाहन आहे.

दरम्यान, 27 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाने सूचना जारी करत साचलेल्या तलाव, नद्या आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करण्यास सक्त मनाई केली आहे. आतापर्यंत केरळमध्ये या संसर्गाचे 66 रुग्ण आढळले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!