Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

चेतेश्वर पुजारावर कोसळला दुःखाचा डोंगर; मेहुणा जीत पाबारीने संपवलं जीवन

चेतेश्वर पुजारावर कोसळला दुःखाचा डोंगर; मेहुणा जीत पाबारीने संपवलं जीवन

Jit Pabari Death: माजी भारतीय क्रिकेट स्टार चेतेश्वर पुजाराचा मेहुणा जीत पाबारीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जीतच्या आत्महत्येने राजकोटमधील पाबारी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. जीतच्या होणाऱ्या मंगेतरने त्याच्यावर २०२४ मध्ये मालवीय नगर पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

जीतच्या होणाऱ्या मंगेतरने आपल्या तक्रारीत गंभीर आरोप केले होते. तिने आरोप केला आहे की, जीत पाबारी यांनी लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. चेतेश्वर पुजाराचे सासरचे लोक मूळचे जामजोधपूरचे आहेत. परंतु गेल्या वीस वर्षांपासून ते राजकोटमध्ये राहत आहेत.

हेही वाचा – भारताला मोठा धक्का! दुसऱ्या कसोटीत भारताचा 408 धावांनी पराभव; दक्षिण आफ्रिकेने तब्बल 25 वर्षांनंतर जिंकला सामना

दरम्यान, जीतची बहिण पूजा पाबारी यांचे लग्न पुजारा यांच्याशी झाले आहे. पूजा पाबारीचा जन्म गोंडल येथे झाला आणि तिने अहमदाबादमध्ये उच्च शिक्षण घेतले. एका बहुराष्ट्रीय कंपनीत एक वर्ष काम केल्यानंतर, तिने चेतेश्वर पुजारा यांच्याशी लग्न केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!