Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

त्वरा करा ! ‘ही’ कंपनी तुम्हाला देतीये फ्री स्क्रीन कार्ड अन् बरंच काही; फक्त त्यासाठी…

त्वरा करा ! ‘ही’ कंपनी तुम्हाला देतीये फ्री स्क्रीन कार्ड अन् बरंच काही; फक्त त्यासाठी…

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. त्यात iQOO कंपनी भारतात आपला नवा स्मार्टफोन iQOO 15 लाँच करणार आहे. कंपनी हा फोन 26 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे, ज्याची किंमत 60000 पर्यंत असू शकते. स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी, iQOO ने सर्व्हिस डेची घोषणा केली आहे. या डे अंतर्गत, कंपनी iQOO डिव्हाइसेससाठी मोफत सेवा देत आहे.

तुम्ही तुमच्या डिव्हाइसेसना iQOO सर्व्हिस सेंटरमध्ये मोफत सर्व्हिसिंग करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस द्यावे लागणार नाही. तुम्हाला फ्री क्लिनिंग, सॅनिटायझेशन, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि निवडक अॅक्सेसरीज देखील मिळतील. iQOO ने X वर पोस्ट करून त्यांचा मंथली सर्व्हिस डे जाहीर केला आहे. या डेदरम्यान तुम्ही तुमच्या iQOO डिव्हाईसेसह कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला भेट देऊ शकता. या काळात, तुमच्या फोनची वॉरंटी संपली असली तरी, दुरुस्तीसाठी कोणतेही चार्ज आकारले जाणार नाही. मात्र, स्पेअर पार्ट्ससाठी तुम्हाला चार्ज लागणार आहे.

iQOO लवकरच भारतीय बाजारात त्याचे प्रमुख डिव्हाइस लाँच करत आहे. रिपोर्टनुसार, iQOO 15 ची किंमत 60000 रुपयांपासून सुरू होऊ शकते. हे डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरसह येईल. यात 50MP + 50MP + 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. समोर 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाईल. स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी असणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!