नवी दिल्ली : आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात वाय-फाय उपलब्ध आहे. मात्र, लोक अनेकदा तक्रार करतात की, त्यांचे इंटरनेट अचानक स्लो आहे किंवा नेटवर्क व्यवस्थित काम करत नाही. याचे एक कारण असे असू शकते की तुमचा शेजारी किंवा एखादा अनोळखी व्यक्ती तुमचे वाय-फाय वापरत आहे.
कधीकधी, पासवर्ड लीक झाल्यामुळे किंवा पासवर्ड सेट न केल्यामुळे युजर्सला कळूही न देता इतर लोक गुपचूप नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकतात. पण, आता काही सेटिंग्ज केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकणार आहे. सर्वप्रथम, कोणती डिव्हाईसेस जोडलेली आहेत ते तपासा. जर तुम्हाला संशय असेल की कोणीतरी दुसरे तुमचे इंटरनेट वापरत आहे, तर तुमच्या राउटरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन कनेक्ट केलेल्या डिव्हाईसेसची यादी तपासा. हे करण्यासाठी, राउटरच्या ॲडमिन पॅनलमध्ये लॉग इन करा. तुम्हाला “कनेक्टेड डिव्हाइसेस” (Connected Devices) किंवा “अटॅच्ड डिव्हाइसेस” (Attached Devices) सारखा पर्याय दिसेल.
हा पार्ट तुमच्या वाय-फायशी कनेक्ट केलेल्या सर्व मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर डिव्हाईसेसची माहिती देईल. जर तुम्हाला यादीमध्ये एखादे अनोळखी उपकरण दिसले, तर ते त्वरित ब्लॉक करा. जर एखादे अज्ञात डिव्हाइस दिसले, तर पासवर्ड बदलणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. जुना पासवर्ड वापरणे धोकादायक ठरू शकते. नवीन पासवर्ड मजबूत असावा. त्यात मोठी आणि लहान अक्षरे, अंक आणि विशेष चिन्हे (@, #, $, !) यांचा समावेश असावा. पासवर्ड किमान १२ अक्षरी ठेवण्याचा प्रयत्न करा.


