नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात मोटोराला कंपनीने दमदार बॅटरीचा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे असलेला बजेट 5G फोन Moto G67 Power भारतात लाँच करण्यात आला आहे. हा फोन कंपनीच्या G-सीरीजमधील नवीन आहे, जो शक्तिशाली फीचर्स असणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.
कंपनीने हा फोन १५००० रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत लाँच केला आहे. या फोनमध्ये 7000mAh ची दमदार बॅटरीही असणार आहे. हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ब्रँडने हा नवीन फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे. तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करू शकता. यात ५०MP मेन लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने Moto G67 Power 5G हा फोन १५९९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत लाँच केला आहे.
दरम्यान, ही किंमत 8GB RAM + १२८GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी असणार आहे. कंपनीने अद्याप ८GB RAM + २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत जाहीर केलेली नाही. कंपनीकडून एसबीआय आणि अॅक्सिस कार्डवर १००० रुपयांची सूट दिली जात आहे. तुम्ही फोन नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.


