Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

काळे की पांढरे? कोणत्या अंड्यात असतात जास्त प्रोटीन, जाणून घ्या त्याचे फायदे…

काळे की पांढरे? कोणत्या अंड्यात असतात जास्त प्रोटीन, जाणून घ्या त्याचे फायदे…

‘संडे हो या मंडे…रोज खावो अंडे…’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकले असेल. तर हे खरं आहे. कारण, अंडे खायला कोणताही दिवस अथवा वेळ लागत नाही. यातून चांगल्या प्रमाणात प्रोटीन अर्थात प्रथिने मिळतात. पण, अंड्यांचे प्रकारही आता पाहिला मिळत आहे. एक रेग्युलर अंडी, दुसरा गावरान अंडी तर तिसरा प्रकार म्हणजे काळी अंडी. मात्र, यापैकी कोणत्या अंड्यांत जास्त प्रोटीन असतात हे तुम्हाला माहिती नसेल. याचीच माहिती आम्ही देत आहोत.

काळी अंडी कडकनाथ कोंबडीची असतात. ही भारतातील मूळची कोंबडीची एक अनोखी जात आहे, जी काळी पंख, काळे मांस आणि गडद अंड्यांसाठी ओळखली जाते. कडकनाथ कोंबडी बहुतेक मध्य प्रदेशातील आदिवासी भागात आढळतात. त्यांची अंडी स्वादिष्ट असतात, त्यात प्रथिने जास्त असतात आणि फॅट्स कमी असतात. त्यामुळे याला मागणीही जास्त आहे. कडकनाथची अंडी पौष्टिकतेच्या बाबतीत नियमित अंड्यांपेक्षा खूपच चांगली आहे. १०० ग्रॅम काळ्या अंड्यांमध्ये अंदाजे १५.६ ग्रॅम प्रथिने असतात, जे पांढऱ्या आणि तपकिरी अंड्यांच्या प्रमाणापेक्षा जवळजवळ दुप्पट असतात.

तर, सामान्य अंड्यांच्या तुलनेत त्यामध्ये फॅट्स (१ ग्रॅम) आणि कोलेस्ट्रॉल (१८० मिलीग्राम) देखील लक्षणीयरीत्या कमी असते, ज्यामध्ये अंदाजे ५.८ ग्रॅम फॅट्स आणि ३७२ मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. जर तुम्ही जिममध्ये जात असाल अन् बॉडी बनवायची असेल तर कडकनाथची अंडी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. ते केवळ प्रथिने समृद्ध नसून हलके आणि निरोगी देखील आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!